breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

समीर भुजबळांचा जामीन लांबणीवर…

  • अर्जावर सोमवारी सुनावणी 

मुंबई – राजधानी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनासह अनेक गैरव्यवहारांप्रकरणी मनी लॉडरिंग कायद्यांतर्गत दोन वर्षे अटकेत असलेल्या समीर भुजबळ यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. न्यायमूर्ती व्ही. एल. अचलीया यांनी जामीन अर्जाची सुनावणी सोमवार, 21 मेपर्यंत तहकूब ठेवली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर समीर भुजबळ यांना जामीन मिळणार का याचा निर्णय सोमवारपर्यंत पुढे गेला आहे.

महाराष्ट्र सदन बांधकाम, कालीना येथील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या इमारतीचे बांधकाम, अंधेरी आरटीओ प्रकरण, मुंबई नाशिक हायवे टोल, वांद्रे येथील एमआयजी कॉलनी, नवी मुंबई हेक्‍स वर्ल्ड गृहप्रकल्प अशा अनेक प्रकल्पातून भुजबळ कुटूंबियांनी सुमारे 840 कोटींचा घोटाळा प्रकरणी ईडीने समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांना अटक केली.
गेल्याचा आठवड्यात छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला. तर समीर भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून केलेला अर्ज न्यायालयालयात प्रलंबित होता.

छगन भुजबळ यांच्या जामिनाविषयीच्या आदेशाची प्रत उपलब्ध होताच समीर यांनाही तातडीने जामीन मंजूर करण्याची विनंती करणारा अर्ज ऍड. एस. के. सक्‍सेना यांनी उच्च न्यायालयात केला होता. त्या अर्जावर न्यायमूर्ती व्ही. एल. अचलीया यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने उभयपक्षांच्या युक्तीवादाला होणार विलंब आणि न्यायालयाच्या बोर्डावर असलेली प्रकरणे पाहता या अर्जाची सोमवारपर्यंत सुनावणी तहकूब ठेवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button