breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात लॉकडाऊनमुळे प्रसिद्ध हॉटेल व्यवस्थापकावर ओढावलं नैराश्य, उचललं टोकाचं पाऊल

धायरी | राज्यात कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांनी प्राण गमावले. पण या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. याच नैराश्यातून पुण्यात हॉटेल व्यवस्थापकाने टोकाची भूमिका घेतली आहे.

सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एका हॉटेल व्यवस्थापकाने हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर प्रकार आज गुरुवार सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास उघडीस आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमनाथ कृष्णा शेट्टी (वय: 43 वर्षे, रा. हॉटेल राज, धायरी, ता. हवेली जि. पुणे) असं आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यवस्थापकाचं नाव आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमनाथ हे गेल्या सात वर्षांपासून ‘हॉटेल राज’ चालवत होते. लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यांपासून हॉटेल बंद होतं. त्यामुळे नैराश्य येऊन त्यांनी हॉटेलमध्येच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास एका कर्मचाऱ्याने हॉटेल उघडल्यानंतर सदर घटना उघडीस आली. दरम्यान, घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून ‘लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहे. त्यामुळे मला नैराश्य आल्यानं मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये’ असं त्यात लिहिलं आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button