breaking-newsमनोरंजन

वाणी कपूरचे रणवीरला किस आणि रणबीरबरोबर रोमान्स

रणवीर सिंहबरोबर “ऑनस्क्रीन’ रोमान्स केलेली वाणी कपूर आता रणबीर कपूरबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. रणबीर कपूरबरोबर ती आगामी “शमशेरा’मध्ये दिसणार आहे.

दिग्दर्शक करण मल्होत्राने याला दुजोरा दिला आहे. वाणी आणि रणबीरच्या “शमशेरा’चे शुटिंग यावर्षाच्या अखेरीस सुरू होईल. हा वाणीचा चौथा सिनेमा असणार आहे. यापूर्वी “शुद्ध देसी घी’, “आशा कल्याणम’ (तामिळ) आणि “बेफिक्रे’मध्ये वाणी दिसली होती. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी तिने टुरिझम विषयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि जयपूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये इंटर्नशीपला सुरुवातही केली होती.

याच दरम्यान तिला मॉडेलिंगच्या काही असाईनमेंटही मिळायला लागल्या होत्या. याच दरम्यान तिने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी काही ऑडिशनही दिल्या आणि “शुद्ध देसी घी’साठी तिची निवड झाली होती. याशिवाय यशराज फिल्म्सच्या तीन सिनेमांसाठीही तिने करार केला आहे. याच तीन सिनेमांपैकी एक आहे,

“शमशेरा’ या सिनेमाच्याबाबत एक अपडेट महत्वाचा आहे. तो म्हणजे यामध्ये संजय दत्तही एका महत्वाच्या रोलमध्ये दिसणार आहे. संजय दत्त यामध्ये निगेटिव्ह रोलमध्ये असेल. संजय दत्त आणि “संजू’मध्ये त्याचा रोल करणारा रणबीर कपूर हे दोघेही एकाचवेळी आमने सामने असतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button