breaking-newsमनोरंजन

एकता कपूर भडकली

अनेक टिव्ही मालिकांचे यशस्वी प्रॉडक्‍शन करणाऱ्या एकता कपूरने अलिकडेच एका युट्युबरला चांगलेच फैलावर घेतले होते. एकताच्या बालाजी प्रॉडक्‍शनची निर्मिती असलेल्या “कसम से’ची चेष्टा या युट्युबरने केली होती. हा युट्युबर एक स्वीडीश आहे. त्याने युट्युबवर एक स्क्रीन शॉट शेअर केला होता. हा स्क्रीन शॉट एकताच्या “कसम से’मधील व्हिडीओचा होता. त्याने या स्क्रीन शॉटच्या खाली कॅप्शन दिली होती “कसम से’चे ओरिजिनल टायटल सॉंग “गुड क्‍वालिटी’. त्याच्या या कॅप्शनमध्ये खरे तर काहीच वावगे वाटायला नको होते.

मात्र ज्याला त्याने चांगली क्‍वालिटी असे म्हटले होते, ती प्रत्यक्ष्यात अतिशय भिकार क्‍वालिटी होती. एकताने हा स्क्रीन शॉट बघितला आणि ती भडकली. “तू कोण आहेस. तू तर फिरंगी ज्युनिअर आर्टिस्ट वाटतो आहेस. पॅरिसचा सीन करायचा असेल तेंव्हा आम्ही कुलाब्याच्या अशाच ज्युनिअर आर्टिस्टना घेत असतो.

तू स्वतःसारखा दिसणारा कोणीतरी “कसम से’मध्येच शोधणार.’ असे ऐकवल्यानंतरही एकताच्या या रागातल्या ट्‌विट नंतर तिच्यावर वांशिक भेदाचा आरोपही व्हायला लागला आहे. मात्र या युट्युबरचा हेतू किती वाईट होता, हे दर्शवण्यासाठीच आपल्याला असे उदाहरण द्यावे लागल्याचे तिने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button