breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकडमधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड प्रभागांतर्गत वाकड भागातील सात अनधिकृत बांधकामांवर बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली आहे.

प्रभाग क्रमांक 25 वाकड येथील परिसरात बेसुमार अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्यातील काही अनधिकृत बांधकामांवर आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 9 हजार 12 चौरस फुट बांधाकामांवर कारवाई केली आहे. त्यात तीन आरसीसी बांधकाम, तीन वीटांचे बांधकाम आणि एक पत्राशेड हटविण्यात आले आहे.

ही कारवाई कार्यकारी अभियंता सतिश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपभियंता आबासाहेब ढवळे, कनिष्ट अभियंता, बीट निरीक्षक यांच्या पथकाने केली. त्यासाठी 20 पोलीस, 2 जेसीबी, एक ट्रॅक्टर कॉम्प्रेसर, 1 ट्रक आणि 16 मनपा कर्मचारी कार्यरत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button