breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘तहसिल आपल्या दारी’ उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमीत्त पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक नामदेव ढाके यांच्या प्रयत्नातून आयोजित तहसिल आपल्या दारी मोफत कॅम्प या उपक्रमात आरटीई अंतर्गत प्रवेश मिळण्यासाठी गरीब विद्यार्थी पालकांना मोफत उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शुक्रवार दि. 14 रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक नामदेव ढाके, माजी उपमहापौर तथा नगरसेवक सचिन चिंचवडे यांच्या हस्ते नागरिकांना उत्पन्नाचा दाखला वाटप करून झाले. यावेळी, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, विशेष कार्यकारी अधिकारी शंकर पाटील, रविंद्र ढाके, शुभम ढाके, प्रदिप पटेल, माऊली जगताप, तुषार नेमाडे, राकेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 17 मधील रहिवासी नागरिकांसाठी तहसिल आपल्या दारी हा मोफत कॅम्प राबविण्यात येत आहे. कॅम्पला पहिल्याच दिवशी नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये, 340 अर्जांची नोंद झाली असून 80 उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात तहसीलदार गिता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अंकुश आटोळे, मंडल अधिकारी गणेश सोमवंशी, चिंचवड तलाठी अर्चना रोकडे, आकुर्डी तलाठी शांता वानखेडे, कोतवाल रविंद्र जगताप यांच्या नियंत्रणात उत्पन्नाचा दाखला देण्यात येत आहे. नागरिकांना एकाच छताखाली उत्पन्नाचा दाखला, तसेच आवश्यक कागदपत्रे मिळावे, या हेतून शुक्रवार दि. 14 आणि शनिवार 15 फेब्रुवारी या कालावधीत दोन दिवसीय तहसिल आपल्या दारी मोफत कॅम्प नगरसेवक नामदेव ढाके यांच्या जनसंपर्क कार्यालयात राबविण्यात येत आहे. तसेच, याठिकाणी ऑनलाईन आरटीई फार्म देखील भरून देण्यात येत आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना नगरसेवक नामदेव ढाके म्हणाले, शासनाचे सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत सर्वसामान्यांसाठी खाजगी शाळेत 25% गरीब मुलांसाठी राखीव असलेल्या जागांसाठी प्रवेश मिळावा, या करीता तहसिलदारांचा उत्पनाचा दाखला महत्त्वाचा आहे. या परिसरात मोठ्या संख्येने कामगार वर्ग रहिवासास आहे. आपले दैनंदिन काम सोडून आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या विविध दाखल्यांसाठी त्यांना शासकीय कार्यालयांमध्ये पैसे देवून अनेक फेर्‍या माराव्या लागतात. त्यात त्यांचा वेळही खर्ची होतो. असे असतानाही त्यांना वेळेवर कागदपत्रे मिळत नाही. दारिद्र्य रेषेखालील असलेल्या कुटूंबामधील गरिब विद्यार्थांसाठी खाजगी शाळेत 25% शिक्षणाचा हक्क (RTE)प्रवेश प्रक्रीये करीता लागणारा तहसिलदारांचा उत्पन्न दाखला तत्काळ व मोफत मिळावा.नागरिकांची होणारी फरपट थांबावी, यासाठी तहसिल आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाला पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला. तरी सर्व नागरिकांनी या उपक्रमात लाभ घ्यावा, असे आवाहन देखील ढाके यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश महाजन, वसंत नारखेडे, दर्शन महाजन, कैलास रोटे, कुशल नेमाडे, मनोज ढाके, राहुल पाचपांडे आदी परिश्रम घेत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button