breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

डाॅ.डी.वाय.पाटील वैदकीय महाविद्यालयाची ‘गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड’मध्ये नोंद

  • एका तासात 307 नागरिकांचा रक्तदाब तपासणी करुन रचला इतिहास 
  •  ग्लेनमार्क फार्मा कंपनीकडून देशभरात 37 संस्थेने केली तपासणी  

पिंपरी ( महा ई न्यूज ) – जागतिक हृदय दिनानिमित्त ग्लेनमार्क फार्मा कंपनीने रक्तदाब तपासणी मोहीम घेतली. या मोहीमेत देशभरातील 37 संस्थाकडून सहभाग घेतला.  पिंपरीतील डाॅ.डी.वाय.पाटील वैदकीय महाविद्यालयाने रविवारी (दि.24) 307 नागरिकांचा रक्तदाब तपासणी करुन उच्चांक गाठला आहे. या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद घेतली आहे, अशी माहिती डाॅ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डाॅ.पी.डी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी विद्यापीठीचे कुलगुरु डाॅ. एन.जे.पवार, डाॅ. यशराज पाटील, डाॅ. जे.एस.भावलकर, डाॅ. ए.एल.काकराणी, डाॅ. मानसी हराळे उपस्थित होते. जागतिक हृदय दिनानिमित्त  ग्लेनमार्क फार्मा कंपनी सीएसआर फंडातून विविध उपक्रम राबवित असते. यंदा ग्लेनमार्क फार्मा कंपनीने देशभरात 41 पैकी 37 मेडीकल संस्थाची निवड केली. त्यामधून देशभरात नागरिकांना वाढलेला रक्तदाब तपासणी मोहीम घेतली. एका तासात कमीत कमी 200 व्यक्तीचे रक्तदाब तपासणीचे टार्गेट दिले.

पिंपरीतील डाॅ.डी.वाय.पाटील वैदकीय महाविद्यालयाने रविवारी (दि.24) सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत 307 नागरिकांचा रक्तदाब तपासणी करण्यात आली. या उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये झाली आहे. या मोहीमेत औषध विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डाॅ. ए.एल.काकरानी, सहायक प्राध्यापक डाॅ.मानसी हराळे यांना गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डने सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आला.

दरम्यान, डाॅ. काकरानी म्हणाले की, भारतात 23.5 पुरुष आणि 22.5  स्त्रिया असे रक्तदाबाचे प्रमाण आहे. त्यामुळे ग्लेनमार्क फार्मा कंपनीने रक्तदाब तपासणी मोहीम घेतली. या मोहीमेत देशभरात 37 सेंटरमधून तब्बल 11 हजार नागरिकांची रक्तदाब तपासणी पुर्ण केली. यावेळी कंपनीने व्हिडिओ आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावून ही मोहीम घेतली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button