breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोणाच्या आदेशाने मुकबधीरांवर लाठीचार्ज?, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या कृत्याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पुण्यात मूकबधिर मोर्चेक-यांवर पोलिसांचा अमानूष लाठीचार्ज

न्याय मागण्यांसाठी शांततेत मोर्चा काढणाऱ्या मूकबधीर तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. ही अत्यंत निंदनीय आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा. तसेच, शांततेने मोर्चा काढणाऱ्या मुलांनी असा कोणता गोंधळ घातला की, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, असा सवाल करत गृहमंत्री म्हणून फडणवीस हे संपूर्णत: अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button