breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

वसईत उपाहारगृह कर्मचाऱ्यास विष पाजले; हुक्का पार्लरची तक्रार केल्याच्या संशयातून कृत्य

वसई | महाईन्यूज

हुक्का पार्लरमधील कथित गैरकृत्यांची तक्रार केल्याच्या संशयावरून उपाहारगृहातील कर्मचाऱ्याला विष पाजून मारण्याचा प्रयत्न रविवारी करण्यात आला. हा कर्मचारी खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल आहे.

याप्रकरणी पोलिसांनी हुक्का पार्लरच्या मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकास अटक केली. वसईच्या पश्चिमेकडील दत्तानी मॉलमध्ये दुसऱ्या मजल्यावर एम जी वॉव उपाहारगृह असून तेथे जितेंद्र कदम आचारी आहे. रविवारी रात्री १०.३०च्या सुमारास उपाहारगृह बंद झाल्यानंतर जितेंद्र पारनाका येथील घरी जाण्यासाठी मॉलसमोर रिक्षामध्ये बसला. यावेळी रिक्षात आणखी दोघेजण बसले होते. जितेंद्रने रिक्षाचालकास पारनाका येथे नेण्यास सांगितले. रिक्षाचालकाने पारनाका येथे जाण्याऐवजी रिक्षा उमेळा फाटा येथून नायगावच्या दिशेने वळवली. जितेंद्रने हरकत घेतली असता रिक्षातील दोघांनी त्याचे हात पकडून जबरदस्तीने त्याला विषारी द्रव्य पाजले. त्यानंतर त्याला उमेळा फाटकानजीक रिक्षातून बाहेर फेकले.

काही वेळाने जितेंद्रला चक्कर येऊ न उलटय़ा सुरू झाल्या होत्या. त्याही स्थितीत त्याने मोबाईलवरून मोठा भाऊ दीपक याच्याशी संपर्क साधला. दीपक याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी पहाटे आफताब पारीख आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर आफताबला अटक करण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button