breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कंपाऊंडरला सतत चर्चेत राहायची भूक, संजय निरुपमांचा राऊतांना अप्रत्यक्ष टोला

मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची काल (२६ सप्टेंबर) मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली होती. राऊत-फडणवीस यांच्या या गुप्त भेटीनंतर राज्यातील राजकीय चर्चेला उधान आले आहे. संजय राऊत आणि भाजपकडून या भेटीमागील कारण स्पष्ट केले असले तरीही या भेटीची सगळीकडे जोरदारचर्चा सुरु आहे. अशात आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. कंपाऊंडरला सतत चर्चेत राहायची भूक लागल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे.

राऊत फडणवीस यांच्या भेटीवर संजय निरुपम यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी राऊतांवर नाव न घेता टीका केली आहे. यात त्यांनी संजय राऊत यांनी कंपाऊंडर कडून औषध घेतो या केलेल्या विधानावरही टीकास्त्र सोडले आहे. “असे वाटतेय की शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहण्याची मोठी भूक लागली आहे. ही भूक नेहमी नेत्यांनाच खाते. ही दुर्भावना नसून वास्तविकता आहे,” अशी टीका केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button