breaking-newsताज्या घडामोडी

पंढरपूर सातारा रस्त्यावरील धोकादायक पूल कोसळला

पंढरपूर | महाईन्यूज

तालुक्यातील सुपली या गावाजवळ पंढरपूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील उजनी उजव्या कालव्यावरचा धोकादायक पूल अचानक कोसळला. स्थानिक तरुण सचिन माळी व काही जागृत रहिवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. या मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्यावरुन वळवण्यात आली असून सदर पुलाच्या ठिकाणी पर्यायी मार्ग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झालेले आहे. रविवारी रात्री हा धोकादायक पूल कोसळला आहे.

सुपली येथील उजनी उजव्या कालव्यावर १९९२ साली पूल बांधण्यात आला आहे. मागील दोन ते तीन वर्षांंपासून हा पूल धोकादायक बनला होता. सध्या उजनी कालव्याला पाणी सोडले आहे. त्यामुळे चार दिवसांपूर्वीच पुलाला असलेल्या एकमेव पिलरची एक भिंत खचली होती. ही बाब स्थानिक रहिवाशांनी बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिली होती. परंतु,अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आणि रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास हा पूल कोसळला. रात्र असल्याने वाहतूक तुरळक होती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पूल कोसळल्याचा मोठा आवाज झाल्यानंतर जवळचे रहिवासी सचिन माळी आणि देविदास माळी यांनी धाव घेतली. त्याच वेळी त्यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरडा करीत दोन्हीही बाजूच्या वाहनांना थांबवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. घटनेनंतर पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button