पुण्यात साडीच्या दुकानाला भीषण आग, पाच कामगारांचा मृत्यू
पुणे – पुण्यातील देवाची ऊरळी येथील राजयोग सेंटर या दुकानाला भीषण आग लागून पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. गुरुवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना घडली आहे.
या अग्निदुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि दहा खाजगी टँकर घटनास्थळी दाखल झाले. दुकानात एकूण पाच कामगार होते. धुरामध्ये गुदमरुन व भाजल्यामुळे कामगारांचा मृत्यू झाला.
Pune: Fire broke out in a cloth godown in Uruli Devachi village in the early hours today. 4 fire tenders were rushed to the spot, fire under control now. Injured rushed to hospital. More details awaited. #Maharashtra pic.twitter.com/ntb8bTwr1Q
— ANI (@ANI) May 9, 2019
या आगीमध्ये मोठया प्रमाणावर जिवीत व वित्तहानी झाली आहे. हे संपूर्ण साडी सेंटर जळून खाक झाले आहे. या आगीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांपैकी चार जण परराज्यातील होते. देवाची ऊरळी येथे अनेक साडयांची दुकाने आहेत. पहाटेच्या सुमारास राजयोग साडी सेंटर दुकानात आग भडकली. आग नेमकी कशामुळे लागली ते अजून समजलेले नाही.
मृतांची नावे
राकेश चौधरी (२४)
राकेश मेघवाल (२०)
धर्माराम बडियासर (२४)
सूरज शर्मा (२५)
गोपाल चांडक (२३)