breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोकांनी रामराज्य मागितलं, राममंदिर नव्हे
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून जोरदार ताशेरे ओढले आहेत. राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून शिवसेनेवर मार्मिक टीका केली आहे.
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राज यांनी काढलेलं व्यंगचित्र ट्वीट केलं आहे. ‘चलो अयोध्या.. अहो देश घातलात खड्ड्यात आता माझ्या नावाने गळा काढता आहात, अरे लोकांनी तुमच्याकडे रामराज्य मागितले होते, राममंदिर नाही, हे राम!’ असं राज यांनी व्यंगचित्रात म्हटलं आहे.