breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकअदालतीत नागरिकांचा गोंधळ; एका दिवसात 26 कोटीचा भरणा

  •  2700 जणांना नोटीस पैकी 701 जणांनी सुमारे 26 कोटीचा भरणा

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या दुष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्यानूसार नोंदणी नसलेल्या मिळकतीचा शोध घेवून नोंदणी करण्यात येत आहे. तसेच थकित मालमत्ता कराची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार आकुर्डी न्यालायता आज (शनिवारी) लोकअदालतीमध्ये 701 मालमत्ताधारकांनी पाच कोटी 38 लाखाचा भरणा केला. तर, 4 हजार 1 मालमत्ताधारकांनी थकबाकीसह मागणीच्या कराचा 20 कोटी 62 लाख रुपयांचा संपूर्ण भरणा केला. त्यामुळे महापालिका तिजोरीत एक दिवसात 26 कोटी रुपयांचा भरणा झाल्याने मालमत्ताधारकांना दंडावर (शास्ती) 90 टक्के सवलत देण्यात आली. दरम्यान, लोकअदालतीत नोटीस दिलेल्या नागरिकांनी संपुर्ण दंडासह शास्तीच्या माफीची मागणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाकडून मालमत्ता कराच्या रकमेची व थकबाकीची वसुली करण्यात येते. शहरातील तब्बल 5 लाख 3 हजार निवासी व बिगर निवासी मिळकतींची नोंद झालेली आहे. या मिळकतधारकांपैकी अनेकांकडून कराचा वेळोवेळी भरणा होत नाही.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशासनुसार आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशावरुन राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी आणि तत्सम प्रलंबित तडजोड योग्य प्रकरणे मार्गी लावली जातात. मालमत्ता कर, पाणीपट्टी संबंधातील प्रकरणाचा न्यायालयामार्फत निवाडा करण्यात येतो. लोक अदालतीमध्ये थकित मालमत्ता कराच्या दंडावर (शास्ती) 90 टक्के सवलत देण्यात आली. त्यानुसार आकुर्डीतील महापालिका न्यायालयात आज (शनिवारी) लोकअदालत घेण्यात आली.

त्यामध्ये 701 लोकांची प्रकरणे मार्गी लावली. 701 मालमत्ताधारकांनी सवलत योजनेचा लाभ घेत पाच कोटी 38 लाखाचा भरणा केला. तर, 4 हजार 1 मालमत्ताधारकांनी थकबाकीसह मागणीच्या कराचा 20 कोटी 62 लाख रुपयांचा संपूर्ण भरणा केला. महापालिका तिजोरीत एक दिवसात 26 कोटी रुपयांचा भरणा झाला असून या मालमत्ताधारकांना दंडावर (शास्ती)90 टक्के सवलत देण्यात आली.

दरम्यान, शास्तीकरामध्ये 90 टक्के माफी मिळणार असल्याचा गैरसमज झाल्याने नागरिक मोठ्या संख्येने तिथे जमा झाले होते. त्यामुळे काही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी नागरिकांची समजूत काढली. तसेच शहरातील निवासी, व्यावसायिक, औद्योगिक सर्व अनधिकृत मालमत्तांचा पूर्वलक्षी प्रभावाने सरसकट शास्तीकर माफ करण्याची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन न्यायाधीशांना देण्यात आले

महापालिकेच्या करसंकलन विभागाला थकबाकी वसुलीत न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा अडथळा होत आहे. 5 लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या 2 हजार 700 जणांना महापालिकेने नोटीस बजावली होती. त्यातील काही थकबाकींदाराकडे एक-दोन कोटींहून अधिक थकबाकी वसुली आहे. त्यात रुग्णालये, शैक्षणिक संस्था, कंपन्या, बड्या व्यक्तींकडून मिळकत कराबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. हे दावे निकाली निघत नसल्याने ही थकबाकी वसूल करण्यास अडचणी येत होत्या.या प्रकरणाकडे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी लक्ष घातले आहे. घरपट्टी, पाणीपट्टी यासह अन्य थकबाकीदारांना नोटीस दिल्या. त्यामुळे आज आकुर्डी न्यायालयात लोकअदालतीत काही प्रकरणे निकाली निघाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button