breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

पेट्रोल पंपावर दरोडा, एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी

नागपूर | पेट्रोल पंपावर दरोडा टाकून एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्याचा खून केल्याची घटना नागपूरच्या हिंगणा तालुक्यात घडली आहे. या घटनेत अज्ञात आरोपींनी झोपेत असलेल्या दोन पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला ज्यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पंढरी भांडारकर असे मृत तर लीलाधर गोहाटे असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील आऊटर रिंगरोड वरील इंडियन ऑइलच्या उगले पेट्रोल पंपावर आज सकाळी ग्राहक वाहनात पेट्रोल भरण्यासाठी आल्यावर ही घटना उघडकीस आली. रात्री पेट्रोल पंप बंद करून हे दोन्ही कर्मचारी पंपावरच झोपले होते. मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी झोपलेल्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर अवजड वस्तूने प्रहार केला ज्यात एकाच जागीच मृत्यू झाला. ज्यानंतर आरोपी पेट्रोल पंपच्या कार्यालयातील रोकड घेऊन पसार झाले. जखमी कर्मचाऱ्याला शासकीय मेडिकल रुग्णालयात दाखल केले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button