breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करा, राष्ट्रवादीसह मनसेची मागणी

  • राष्ट्रवादीचे दत्ताकाका साने, मनसेचे सचिन चिखले यांनी अधिष्ठातांची घेतली भेट

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याचा गंभीर प्रकार रुग्णांच्या नातेवाईकांनी उघडकीस आणली आहे. रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी डॉक्टरांना खुलासा देण्याची कोणत्याही प्रकारची संधी न देता त्वरित निलंबनाची कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांधे दुखी आणि तापामुळे वेताळनगरचा आनंद अनिवाल त्रस्त होता. तो उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल झाला. त्याच्या विविध तपासण्या केल्या गेल्या. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने डायलेसिस करण्याची गरज असल्याचे त्याच्या नातेवाईकांना सांगितले. मात्र, खासगी रुग्णालयातील रिपोर्टनूसार रुग्णाच्या दोन्ही किडन्या उत्तम असतानाही काही कारण नसताना त्याचे डायलिसिसकेले गेले. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे निर्दशनास आले.

त्यामुळे आपल्या रुग्णालयातील अशा बेजबादारपणे काम करणाऱ्या तसेच रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी डॉक्टरांना खुलासा देण्याची कोणत्याही प्रकारची संधी न देता त्वरित निलंबनाची कडकं कारवाई करावी. पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला सेना अध्यक्ष अश्विनी बांगर, जनहित कक्षाचे अध्यक्ष राजु भालेराव, सचिव मनसेचे रुपेश पटेकर व सीमा बेलापूरकर, विभाग अध्यक्ष विशाल मानकरी, दत्ता देवतरासे, संजय दादा यादव, उपशहर अध्यक्ष स्नेहल बांगर व अनिता पांजाळ, महिला सेना अनिता नाईक, शहर संघटक सुशांत साळवी, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष सचिन मिरपगार, पिंपरी विधानसभा उपविभाग अध्यक्ष मिलिंद के सोनवणे, विद्यार्थी सेनेचे विकास कदम, भाग्यश्री चिंचोले, स्वप्नील मंहागरे, आकाश पांचाळ, गणेश वाघमारे, प्रदीप घोडके उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button