breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

भारतीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी राजीव कुमार यांची नियुक्ती

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. ते 1 सप्टेंबरपासून आपला कार्यभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थ सचिव राहिलेल्या राजीव कुमार यांची भारतीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.

राजीव कुमार हे 1984 च्या बॅचचे झारखंड केडरचे अधिकारी आहेत. ते अशोक लवासा यांच्या जागेवर पदभार स्वीकारतील. लवासा यांनी फिलिपीन्समधील एशियन डेव्हलपमेंट बँकेचं उपाध्यपद स्वीकारण्यासाठी निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा दिल्याचं सांगण्यात आलेलं होतं. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना दिलेल्या क्लीन चीट प्रकरणी अशोक लवासा नाराज होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चीट देताना आपलं मत विचारात न घेतल्याने लवासा यांनी बैठकीला न जाणं पसंत केल्याचं सांगण्यात येत होतं. लवासा म्हणाले होते, “बैठकीला जाण्यात काहीही अर्थ नाही. त्यादरम्यान मी दुसऱ्या कामात तरी लक्ष देऊ शकेन.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button