breaking-newsराष्ट्रिय

लडाखमध्ये १५ हजार भारतीय जवान अनेक रणगगाड्यांसह तैनातीसाठी रवाना

लडाख – पूर्व लडाखच्या दौलतबेग ओल्डी (डीबीओ) आणि देपसांग परिसरात चीनने १७ हजार जवान आणि चिलखती वाहने तैनात केल्याच्या वृत्तानंतर भारतीय लष्करही जोरदार प्रत्युत्तराच्या तयारीत आहे. सूत्रांनुसार, पूर्व लडाखमध्ये टी-९० रणगाड्यांचे रेजिमेंट चिनी लष्कराच्या कोणत्याही कारवाईला उत्तर देण्यास सज्ज आहे. या दोन्ही भागात पीएलएच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी काराकोर्रम दरीजवळ पेट्रोलिंग पॉइंट १ पासून देपसांग प्लेन्सपर्यंत रणगाड्यांची रेजिमेंट तैनात आहे.

या भागात चीनचे १७ हजार जवान आहेत. त्यांनीच भारतीय जवानांना पीपी-१० व पीपी-१३ मध्ये गस्त घालण्यापासून रोखले हाेते. चीनचे डीबीओ व डेपसांग येथे बांधकाम सुरू करण्यापूर्वी या संपूर्ण प्रदेशाची निगराणी माउंटन ब्रिगेड व चिलखती ब्रिगेडद्वारे केली जात होती. आता येथे भारताचे १५ हजार जवान व अनेक रणगाडे रेजिमेंटकडे तैनातीसाठी रवाना झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button