breaking-newsक्रिडा

फिफा विश्वचषक : ट्युनिशियाची बेल्जियमसमोर सपशेल शरणागती

मॉस्को – रोमेलु लोकाकु, एडन हेझार्ड आणि मिकि बाटशुआयी यांच्या धडाकेबाज खेळीच्या जिवावर बलाढ्य बेल्जियमने ट्युनिशियाचा 5-2 असा एकतर्फी पराभव करत बाद फेरीतील आपला प्रवेश निश्‍चित केला आहे. सामन्यातील बेल्जियमच्या आक्रमणासमोर ट्युनिशियाने सपशेल शरणागती पत्करली.

सामन्याच्या पहिल्याच मिनिटापासून बेल्जियमच्या संघाने चेंडूवर नियंत्रण मिळवत ट्युनिशियावर दबाव टाकायला सुरुवात केली, या दबावामुळे ट्युनिशियाच्या धसमुसळेपणामुळे बेल्जियमला 5व्याच मिनिटाला पेनल्टी बहाल करण्यात आली. याचा फायदा उचलत एडन हझार्डने गोल करत संघाचे खाते उघडत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर 16व्या मिनिटाला रोमेलु लोकाकुने गोल करून ही आघाडी 2-0 अशी वाढवत ट्युनिशियावरील दबाव आणखीन वाढवला.

मात्र 18व्या मिनिटाला बेल्जियमच्या खेळाडूच्या चुकीमुळे मिळालेल्या फाऊलचा फायदा घेत ट्युनिशियाच्या टायलन बोरॉनने गोल करत संघाचे खाते उघडत बेल्जियमची आघाडी 2-1 अशी कमी करण्याचा प्रयत्न केला. या गोल नंतर ट्युनिशियाने आक्रमक भूमिका घेत बेल्जियमच्या गोलपोस्टच्या दिशेने आक्रमण करायला सुरुवात केली, ज्यात पुढील 20 मिनिटांत त्यांना जवळपास 4 वेळा गोल करण्याची संधी मिळाली मात्र त्यांना मिळालेल्या संधीचा फायदा उचलता आला नाही. हाफ टाईम झाल्यानंतर मिळालेल्या अतिरिक्त वेळेतील 4थ्या मिनिटाला बेल्जियमच्या रोमेलु लोकाकुने गोल नोंदवत बेल्जियमला 3-1 अशी आघाडी मिळवून देत सामन्यातील आपला दुसरा आणि स्पर्धेतील चौथा गोल नोंदवला. हाफ टाईम नंतर लागलीच 51व्या मिनिटाला एडन हेझार्डने ट्युनिशियाच्या गोलकीपरला चकवत बेल्जियमसाठी चौथा आणि सामन्यातील आपला दुसरा गोल करत ही आघाडी 4-1 अशी केली.

बेल्जियमच्या आक्रमणापुढे ट्युनिशियाचा संघ स्पशेल शरणागती पत्करताना दिसून येत होता. संपूर्ण सामन्यावर बेल्जियमच्या संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले. तरीही सामन्याच्या संपूर्ण वेळेच्या 51 टक्‍के वेळ चेंडूवर ट्युनिशियाच्या खेळाडूंनी नियंत्रण गाजवले होते. सामन्याच्या 51व्या मिनिटाला झालेल्या गोलनंतर पुढील 40 मिनिटे एकही गोल झाला नाही त्यामुळे 90 व्या मिनिटाला बेल्जियमकडे 4-1 अशी विजयी आघाडी होती. मात्र अतिरिक्त वेळेत बेल्जियमच्या मिकी बाटशुआयीने गोल करत संघासाठी 5व्या गोलची नोंद केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button