breaking-newsआंतरराष्टीय

अफगाणिस्तानातील तुरुंगावर आत्मघातकी हल्ला; २९ जणांचा मृत्यू

काबुल – अफगाणिस्तानच्या पूर्व नांगरहर प्रांतातील तुरुंगावार इस्लामिक स्टेट गटाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात २९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५० हून अधिक जखमी झाले. नांगरहार प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ते अताउल्लाह खोग्यानी यांनी यासंदर्भात माहिती दिली.

दहशतवाद्यांनी रविवारी संध्याकाळी जलालाबाद येथील कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ आत्मघातकी कार बॉम्बस्फोट केला. त्यानंतर अफगाण सुरक्षा दलावर बेछूट गोळीबार केला. अफगाण सुरक्षा दलाचे सैनिक आणि दहशतवाद्यांमधील ही चकमक १८ तास चालली. काल सोमवारी सकाळीही तुरुंगातून गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात 29 जण ठार झाले आहेत. तर ५० हून अधिक जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांमध्ये कैद्यांबरोबरच नागरिक, तुरुंगरक्षक आणि सुरक्षा दलाच्या जवानांचा समावेश आहे. या तुरुंगात अंदाजे दीड हजार कैदी आहेत. या हल्ल्यामागचा दहशतवाद्यांचा उद्देश अद्याप समजू शकला नाही. या हल्ल्यादरम्यान काही कैद्यांनी तुरुंगातून स्वत:ची सुटका करून घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button