breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाढदिवस बेतला जीवावर; लोनावळामध्ये खाणीत बुडून दोघांचा मृत्यू!

लोणावळा |

पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांना वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणं जीवावर बेतलं आहे. मागील आठवड्यात वाढदिवस झाल्यानंतर त्यांचं सेलिब्रेशन म्हणून पाच मित्र लोणावळ्याच्या कुसगाव परिसरात फिरण्यासाठी आले होते. तेव्हा, ही दुर्दैवी घटना घडली असून यात खाणीत बुडून वाढदिवस वाढदिवस झालेल्या तरुणासह त्याच्या मित्राचा मृत्यू झाला आहे. आकाश गुरव आणि धिरेंद्र त्रिपाठी अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात राहणाऱ्या आकाश गुरवचा मागील आठवड्यात वाढदिवस झाला होता. त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी आकाश त्याच्या मित्रांसह लोणावळा परिसरात फिरण्यासाठी आला होता. दरम्यान, आकाश आणि धिरेंद्र हे दोघे ही खाणीत पोहण्यासाठी उतरले तेव्हा, त्या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने पोहत असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवार रोजी दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती तातडीने लोणावळा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. तर, शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button