breaking-newsराष्ट्रिय

राहुल गांधींना पंतप्रधान करायचे असेल, तर ब्राम्हण मुलीशी त्यांचा विवाह लावावा

  • टीडीपी आमदाराने केली सोनिया गांधींना सूचना

विशाखापट्टणम – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना जर पंतप्रधान झालेले बघायचे असेले तर त्यांचा विवाह एखाद्या ब्राम्हण मुलीशी लावून द्यावा, अशी विचित्र सूचना टीडीपीचे आमदार जे.सी.दिवाकर रेड्डी यांनी सोनिया गांधींना केली आहे. उत्तर प्रदेशातील ब्राम्हण समुदायाचा पाठिंबा मिळवायचा असेल, तर चांगल्या ब्राम्हण मुलीशी त्यांचा विवाह लावून देण्यात यावा, असे रेड्डी यांनी म्हटले आहे. आपण पूर्वी कॉंग्रेसमध्ये असतानाच ही सूचना सोनिया गांधी यांना केल्याचेही त्यांनी विशाखापट्टणम इथल्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

उत्तर प्रदेशात ब्राम्हण समुदायाचे वर्चस्व आहे, त्यामुळेच ब्राम्हणांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राहुल गांधी यांचा विवाह ब्राम्हण मुलीशी होणे आवश्‍यक आहे, असे 2014 च्या निवडणूकीपूर्वी आपण सोनिया गांधींना सुचवले होते. मात्र सोनिया गांधींनी आपले काहीही ऐकले नाही, असे रेड्डी म्हणाले.

आंध्रप्रदेशातील अनंतपूर विधानसभा मतदारसंघातून रेड्डी निवडून आले आहेत. सलग सहावेळा ते कॉंग्रेसच्या तिकीटावर या मतदारसंघातून निवडून आमदार झाले आहेत. मात्र 2014 च्या सार्वत्रिक निवडणूकीपूर्वी कॉंग्रेसचा राजीनामा देऊन ते तेलगू देसम पक्षामध्ये गेले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button