breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यात नवे 13 हजार 659 नवे कोरोनाबाधित रुग्ण, रिकव्हरी रेट 95.01 टक्क्यांवर

मुंबई – राज्यात शनिवारी 13 हजार 659 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 21 हजार 776 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 300 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यात आज एकूण 1,88,027 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 55,28,834 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.01% टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 14,00,052 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,093 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील पाच जिल्ह्यामध्ये अॅक्टिव्ह रुग्णसंख्या एक हजारच्या खाली खाली आहे. यामध्ये नंदुरबार, बुलडाणा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात 866 कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 866 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1045 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,77,445 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16,133 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 511 दिवसांवर पोहोचला आहे.

13 महानगगरपालिका आणि 8 जिल्ह्यामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

राज्यातील 13 महानगगरपालिका क्षेत्रात आणि 8 जिल्ह्यामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. ठाणे, ठाणे मनपा, उल्हासनगर मनपा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा-भाईंदर मनपा, पालघर, वसई विरार मनपा, पनवेल मनपा, मालेगाव मनपा, अहमदनगर मनपा, धुळे, धुळे मनपा, नंदुरबार, औरंगाबाद मनपा, जालना, हिंगोली, परभणी मनपा, नांदेड, नांदेड मनपा, अमरावती मनपा, गोंदिया याठिकाणी एकाही रुग्णाचा आज मृत्यू झालेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button