breaking-newsराष्ट्रिय

सुरक्षादलावर दगडफेक करणारे तीन जण गोळीबारात ठार

श्रीनगर – काश्‍मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज सुरक्षा जवानांवर दगडफेक करणाऱ्या जमावावर करण्यात आलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले अन्य काही जण जखमी झाले आहेत. कुलगामच्या रेडवानी भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्करी जवानांची एक तुकडी तिकडे त्यांना शोधण्यासाठी गेली असता तेथील गावकऱ्यांनी लष्करी जवानांवर दगडफेक केली. त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी लष्करी जवानांना गोळीबार करावा लागला.

ठार झालेल्या तीन जणांमध्ये एका सोळा वर्षीय मुलीचा समावेश आहे.या चकमकीत दहा जण जखमी झाले असून त्यातील दोन जणांना गोळ्या लागल्या आहेत. या घटनेनंतर या परिसरात मोठा तणाव झाल्याने तेथे जदा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तेथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button