breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीच्या मुलाखतीला दत्ता साने गैरहजर, चिंचवडमधून शंभर टक्के उपस्थिती

  • प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
  • माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे यांनी दिल्या मुलाखती

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी आज पक्षाकडे मुलाखती दिल्या. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. भोसरीतील इच्छुक आणि प्रबळ दावेदार मानले जाणारे दत्ता साने यांनी मुलाखतीला उपस्थित राहण्याचे टाळून सर्वांनाच धक्का दिला आहे. मुलाखत  देण्यास नकार देऊन दत्ता साने यांनी पक्षाच्या विरोधात बंड करणार असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे भोसरीचा उमेदवार माजी आमदार विलास लांडे की आणखी कोण, हा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदार संघातील इच्छुकांचे अर्ज मागविले होते. त्यावर पिंपरी विधानसभा मतदार संघातून नऊ इच्छुकांनी अर्ज केले. माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक काळूराम पवार, शेखर ओव्हाळ, एड. गोरक्ष लोखंडे, विद्यमान नगरसेवक राजू बनसोडे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, संदीपान झोंबाडे, सुनंदा काटे, गंगा धेंडे या नऊजणांनी पक्षाकडे अर्ज केले होते. त्यातील गंगा धेंडे वगळता इतर सर्वांनीच उपस्थित राहून मुलाखती दिल्या आहेत. गंगा धेंडे अजारी असल्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत, असे कारण राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघातून विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर, सतिश दरेकर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर या आठजणांनी अर्ज केले आहेत. त्यातील सर्वांनीच उपस्थित राहून मुलाखती दिल्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या सर्वांच्या मुलाखती घेतल्या. तसेच, भोसरी विधानसभा मतदार संघातील माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक जालिंदर शिंदे, अजित गव्हाणे, दत्तात्रय जगताप, पंडीत गवळी या सहाजणांची अर्ज केले होते. त्यातील दत्ता साने, अजित गव्हाणे आणि जालिंदर शिंदे हे मुलाखतीस उपस्थित राहिले नाहीत. उर्वरीत उपस्थितांच्या आज रविवारी (दि. 28) पुण्यातील गुलटेकडी, मार्केटयार्ड याठिकाणी सायंकाळी पाच वाजता मुलाखती पार पडल्या.

साने यांनी दिला आश्चर्याचा धक्का

कालच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत शिवबंधन मनगटावर बांधण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर मी कदापी पक्षाला सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया साने यांनी प्रसार माध्यमांना दिली. त्यावर साने यांच्या कार्यकर्त्यांनी चुकून सोशल मीडियावर उध्दव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट टाकल्याचे सांगण्यात आल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, आज पक्षाच्या चक्क मुलखती असताना साने यांनी या मुलाखतीला जाणे टाळून काही कामानिमित्त ते नगरला रवाना झाले. साने यांच्या हालचालींवरून ते पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याचे आता निश्चित मानले जात आहे. विरोधी पक्षनेता पद भोगल्यानंतर लागलीच पक्षावर नाराजी व्यक्त केली जात असल्यामुळे साने यांच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button