breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चंद्रकांत पाटीलांची फेसबुकवर बदनामी, निगडी पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा

पिंपरी / महाईन्यूज

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबाबत फेसबुक अकाऊंटवरून ”एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक” या फेसबुक पेजवर बदनामीकारक आणि विडंबन करणारी छायाचित्रे पोस्ट केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुब जमादार आणि किर्तीसिंह कोरेकर पाटील (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुब जमादार याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे छायाचित्र क्रॉप करून आपल्या फेसबुक अकाऊंटवरून बदनामीकारक मजकुरासह प्रसिद्ध केले. त्याचप्रमाणे किर्तीसिंह कोरेकर पाटील या दुसऱ्या आरोपीने चंद्रकांत पाटील यांचे ते छायाचित्र ”एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक” या फेसबुक पेजवर पाठविले. पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत. निगडी पोलीस ठाण्याचे फौजदार पी. डी. आरदवाड तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button