breaking-newsपिंपरी / चिंचवड

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिव ‘सारथी भगवा सारथी हेल्पलाईन’चा शुभारंभ

पिंपरी, (महाईन्यूज) –  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने मावळ लोकसभेतील मावळ, पिंपरी व चिंचवड विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या नागरी समस्या व तक्रारी सोडविण्यासाठी शिव सारथी- भगवा सारथी ही हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना उपनेते रविंद्रजी मिर्लेकर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, अनंत कोऱ्हाळे, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, भारत ठाकुर, शरद हुलावळे, अंकुश देशमुख, उमेश गोलांडे, रोमी संधू, मदन शेडगे हे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या संकल्पनेतून ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून विभागप्रमुख व शाखाप्रमुख हे प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविणार आहेत. प्रत्येक विभागप्रमुख त्याच्या प्रभागातील तक्रारी हेल्पलाईनद्वारे स्विकारतील. मुख्य हेल्पलाईनवर ती तक्रार पाठवली जाईल. मुख्य हेल्पलाईन (क्र.७७१९९०२९२९) च्या माध्यमातून संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकारी वर्गाकडे या तक्रारी पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती चिंचवडे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button