breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीच्या प्रभागात भाजप आमदाराच्या हस्ते भूमीपूजन सोहळा ‘थाटात’

  • प्रभाग 22 मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसला धोक्याचा इशारा
  • नगरसेवकांच्या भूमिकेबाबत निर्माण झाला संशय

पिंपरी | महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग २२ काळेवाडी येथील ज्योतिबानगरमधील बाजीप्रभू चौक ते तापकीरमळा चौक रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आज थाटात पार पडला. परंतु, हा प्रभाग राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या प्रभागामध्ये भाजप आमदारांच्या हस्ते भूमीपूजन सोहळा घेणे म्हणजे राष्ट्रवादीला धोक्याचा इशारा असल्याची राजकीय चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर,
नगरसदस्य विनोद नढे, संतोष कोकणे, नगरसदस्या निता पाडाळे, उषा काळे, माजी नगरसदस्य प्रमोद ताम्हणकर, उपअभियंता चंद्रशेखर धानोरकर, राजेंद्र जावळे, कनिष्ठ अभियंता संजय कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते विलास पाडाळे, कैलास सानप, विनोद तापकीर, काळूराम नढे, अतुल नढे, विशाल नढे, पद्माकर जांभळे, अरूण बकाल, प्रकाश चिटणीस, संगिता कोकणे आदी उपस्थित होते.

ज्योतिबानगर मधील बाजीप्रभू चौक ते तापकीरमळा चौक रस्त्यावरील काँक्रीटीकरणाच्या कामासाठी सुमारे ६ कोटी ५० लाख इतका खर्च येणार आहे. शहरात सर्वच प्रभागांमध्ये रस्त्याची कामे सुरू आहेत. यापूर्वी आमदार जगतापांनी अशा कोणत्याच प्रभागात आवर्जून केवळ रस्त्याचा भूमीपूजन सोहळा घेतल्याची नोंद आढळत नाही. प्रभाग क्रमांक 22 मध्ये मात्र, त्यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ घेतल्याने राष्ट्रवादीच्या राजकीय भवितव्याला धक्का पोहोचण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांच्या भूमीकेवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यांची ही भूमिका राष्ट्रवादीला धोक्याचा इशारा मानला जात आहे, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button