breaking-newsताज्या घडामोडीपुणे

नायडू सांसर्गिक रुग्णालयात सहा खाटांचा अतिदक्षता विभाग उभारणार

पुणे |महाईन्यूज|

महापालिकेकडून डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात सहा खाटांचा अतिदक्षता विभाग (आयसीयू) उभारण्यात येणार आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयाकडून त्यासाठी आवश्‍यक यंत्रसामुग्री महापालिकेस उपलब्ध करून दिली जाणार असून त्यानंतर पुढील दहा दिवसांत हे आयसीयू सुरू केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्‍त आयुक्‍त रूबल अग्रवाल यांनी दिली. दरम्यान, या आयसीयूसाठी महापालिका अधिनियमातील तरतूदीनुसार, तातडीने आयुक्‍तांच्या अधिकारात तीन कोटींची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आयसीयूसाठी खरेदी केली जाणार असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले. या आयसीयूसाठी महापौर निधीतून रक्‍कम उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने नायडू रुग्णालयात सहा आसन क्षमतेचे आयसीयू उभारले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेची वैद्यकीय उपकरणे खरेदी होईपर्यंत ससूनकडून ही उपकरणे महापालिकेस दिली जाणार आहेत. मात्र, पुढील दहा दिवसांत हा आयसीयू कार्यान्वीत करण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच डॉ. नायडू रुग्णालय तसेच पालिकेने तयार केलेल्या विलगीकरण कक्षांसाठी आवश्‍यक असलेले डॉक्‍टर तसेच इतर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले असून महापालिकेकडून आवश्‍यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button