breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाऊण किलो सोने अन्ं एक क्विंटल चांदी गुन्हेगारांकडून हस्तगत

पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, एक गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुसे असा एकूण एक कोटी ११ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी |महाईन्यूज|

गंभीर गुन्ह्यांत फरार असलेल्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केलीे. त्यांच्याकडून पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण एक कोटी ११ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाकडपोलिसांनी ही कामगिरी केली.

विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय ३१, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे), विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (वय १९, रा. पिसवली, कल्याण) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली. २० सप्टेंबर रोजी वाकड रोड येथे पीआर ज्वेलर्स नावाचे सराफाचे दुकान फोडून तीन किलो चांदी व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी निगडी येथील नवकार ज्वेलर्समधून २० किलो चांदीचे दागिने आणि २६ सप्टेंबर रोजी पिंपरी येथील दुर्गा ज्वेलर्स हे दुकान फोडून पाऊण किलो चांदीचे दागिने चोरीला गेल्याबाबत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.

वाकड पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर यांची दोन पथके तयार करून या गुन्ह्याचा तपास सुरू केला. निगडी येथील चोरी झालेल्या सराफ दुकानापासून काही अंतरावर एक चारचाकी वाहन संशयास्पद आढळले. त्यावरून पोलिसांनी त्या वाहनाचा शोध घेतला असता लोणी काळभोर आणि लोणीकंद येथून दोन चारचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी खराडी, लोणीकंद, चंदननगर, वाघोली भागात शोध मोहीम सुरू केली. त्यासाठी वाकड पोलिसांनी तब्बल दहा दिवस त्या परिसरात तळ ठोकून गुन्हेगारांच्या टोळीचा शोध लावला. सराईत गुन्हेगार विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी आणि त्याची टोळी हे गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

एका चारचाकी वाहनातून आरोपी कल्याणी फिरत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून चारचाकी वाहनासह आरोपी कल्याणी आणि त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. चारचाकीची पाहणी केली असता कल्याणी याच्या वाहनामध्ये दोन लोखंडी कटावण्या, दोन कटर, सहा स्क्रू ड्रायव्हर, एक स्प्रे कॅन मिळाला. तर कल्याणी याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे मिळाली. त्याने वाकड रोडवरील पीआर ज्वेलर्स हे दुकान फोडल्याची कबुली दिली. त्यावरून दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपींकडून एक कोटी ११ लाख ३७ हजार रुपयांचे ७५० ग्राम सोने, १०० किलो चांदी, तीन वाहने, एक पिस्तूल, पाच काडतुसे, कटावण्या असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, जावेद पठाण, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरज सुतार, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, शाम बाबा, नितीन ढोरजे, दीपक भोसले, सचिन नरुटे, प्रमोद भांडवलकर, प्रमोद कदम, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, नूतन कोंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केलीे.

विविध पोलीस ठाण्यांतील ३४ गुन्ह्यांची उकल
आरोपींनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांसोबत वाकड (५ गुन्हे), चिखली (५ गुन्हे), देहूरोड (३ गुन्हे), निगडी (६ गुन्हे), पिंपरी (३ गुन्हे), चिंचवड (२ गुन्हे), सांगवी (२ गुन्हे), भोसरी (२ गुन्हे), एमआयडीसी भोसरी (२ गुन्हे), हिंजवडी (१ गुन्हा), लोणी काळभोर (१ गुन्हा), लोणीकंद (१ गुन्हा), वालीव (१ गुन्हा) या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण ३४ गुन्हे केल्याचे आरोपी यांनी पोलीस तपासात सांगितले. यात घरफोडीचे ३२ तर वाहनचोरीचे दोन गुन्हे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button