breaking-newsराष्ट्रिय

राष्ट्रवादीचे संस्थापक तारिक अन्वर यांची काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे तारिक अन्वर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत तारिक अन्वर यांनी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

तारिक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर काहीसे नाराज होत त्यांनी राजीनामा दिला होता. राफेल डीलप्रकरणात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतली. राफेल प्रकरणावरून मोदींच्या हेतूविषयी जनतेला संशय नाही, असं बोलून पवार साहेबांनी जनतेच्या भावनांचा अनादर केल्याचं तारिक अन्वर म्हणाले होते.

फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी राफेल खरेदीत घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे. त्यात पवारांनी मोदींना दिलेल्या क्लीन चिटवर मी असहमत आहे. मी पक्ष आणि खासदारकीचा राजीनामा देत आहे. शरद पवार यांचा व्यक्तिगतरीत्या मी सन्मान करतो. परंतु त्यांचं हे विधान दुर्दैवी आहे. या विधानानं मला अतीव दुःख झाल्यानं मी हे पाऊल उचललं आहे, असं म्हणत तारिक अन्वर यांनी  राजीनामा दिला होता.

(Rafale Deal Controversy: तारिक अन्वर यांचं वागणं बेजबाबदार, शरद पवारांशी साधं बोललेही नाहीतः प्रफुल्ल पटेल)

https://twitter.com/ANI/status/1056059762117394432

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button