breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

नेहा कक्कर अडकली लग्नाच्या बेडीत; दिल्लीच्या गुरुद्वारामध्ये विवाह संपन्न

नवी दिल्ली: अनेक दिवसांपासून ज्या ग्रँड वेडिंगची चर्चा सुरू होती ते आज पार पडलेलं आहे. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचा लग्नसोहळा संपन्न झालेला आहे. दिल्लीच्या गुरुद्वारामध्ये नेहा आणि रोहनप्रीत लग्नाच्या बेडीत अडकलेले आहेत. गुलाबी रंगाच्या शेडमध्ये नेहाने लग्नाचा लेहंगा घातलेला होता. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अतिशय पारंपरिक पद्धतीने झालेल्या या लग्नसोहळ्यामध्ये दोघांचंही कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होता. पंजाबमध्ये त्यांचं रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनला त्यांचं कुटुंब आणि बॉलिवूडमधील काही कलाकारही उपस्थित राहणार आहेत. नेहाच्या हळदीचे, संगीत सेरिमनीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत होते. तिच्या चाहत्यांना आता तिच्या लग्नाचीच प्रतीक्षा होती. अखेर नेहाने रोहनप्रीतच्या गळ्यात माळ घातली आहे. नेहा आणि रोहनप्रीतचे फॅन्स तिला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत.

https://www.instagram.com/p/CGuRL93A601/?utm_source=ig_embed
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button