breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे, अपक्ष विलास लांडे, राहुल कलाटे यांना जेष्ठनेते आझम पानसरे यांच्यासह मुस्लिम बांधवाचा पाठिंबा

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड शहर भाजपातील जेष्ठ नेते आझम पानसरे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन्ही अपक्ष उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात आज आझम पानसरे यांच्या निवास्थानी महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी शहरातील सर्व मौंलाना आणि मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळी उपस्थित होती. यावेळी आझम पानसरे यांनी पिंपरीतून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे, चिंचवडचे अपक्ष राहुल कलाटे तसेच भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना पाठिंबा दिला आहे.

या बैठकीला पिंपरी चिंचवड शहरातील तीनही उमेदवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रवक्ते फजल शेख, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, जगदीश शेट्टी, नगरसेवक जावेद शेख, माजी नगरसेवक राजाराम कापसे, प्रशांत कापसे, मुस्लिम उलेमा कौन्सिलचे सदर मौलाना फैज अहमद, कार्याध्यक्ष मौलाना हाजी नसीबउल्लाह, मुफ्ती आबीद रजा, उलेमा कौन्सिलचे महासचिव मौलाना नय्यर नूरी तसेच हाजी गुलाम रसूल सय्यद, मोहम्मद अली सय्यद, मेहबूब शेख, लतीफ सय्यद, शफीक शहा, याकूब खान, एजात खान, निहाज शेख, युसुफ कुरेशी, राजू मुलानी, समीर खान मौलाना अजीबी आदी उपस्थित होते. 

यावेळी आझम पानसरे म्हणाले की, अण्णा बनसोडे यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मागील निवडणुकीत त्यांना केवळ 2 हजार 235 मतांनी पराभव पत्करावा लागला. मात्र, पराभव झाल्यानंतरही गेली पाच वर्ष ते सातत्याने समाजातील विविध घटकांच्या संपर्कात आहेत. मुस्लिम बांधवांनीच नव्हे तर समाजातील विविध घटकांनी पिंपरी मतदारसंघातून बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे. त्याच प्रमाणे चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे आणि भोसरी विधानसभेचे अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना देखील प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन पानसरे यांनी केले. 

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आझम पानसरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर महापालिकेत भाजपाला मिळालेल्या यशात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. मात्र त्यानंतर भाजपकडून त्यांचे कोणत्याही प्रकारचे राजकीय पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे नाराज असलेले पानसरे यांनी भाजपापासून दूर राहणे पसंत केले. दरम्यान प्रकृतीच्या कारणास्तव राजकारणापासून थोडेसे लांब झालेले पानसरे यांनी आज पुन्हा सक्रियता दाखवली आहे. अवघ्या पाच दिवसांवर विधानसभा निवडणुका आल्या असताना त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत महायुतीच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी उपस्थित सर्व मुस्लिम पदाधिकारी, मान्यवरांना तसे आव्हान केले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते फजल शेख यांनी दिली आहे.

दरम्यान याबाबत आझम पानसरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. मात्र पानसरे यांच्या भूमिकेमुळे महायुतीच्या तीनही उमेदवारांची चिंता वाढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button