पिंपरी / चिंचवड
कंपनीच्या मोकळ्या जागेतून लोखंडी पाईपांची चोरी
पिंपरी l प्रतिनिधी
खराबवाडी चाकण येथील प्रोगेम इंडस्ट्रीज या कंपनीत चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्याने कंपनीच्या गेटचा पत्रा उचकटून कंपनीच्या मोकळ्या जागेतून लोखंडी पाईप चोरून नेले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 9) रात्री आठ ते बुधवारी (दि. 10) सकाळी साडेआठ वाजताच्या कालावधीत घडली.
शहाजी गुलाबराव मांदे (वय 47, रा. चिखली प्राधिकरण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रोगेम इंडस्ट्रीज या कंपनीच्या मुख्य गेटचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्याने कंपनीच्या आवारात प्रवेश केला. कंपनीच्या ऑफिसच्या खाली मोकळ्या अजागेत ठेवलेले 14 हजार रुपये किमतीचे लोखंडी पाईप चोरट्यांनी चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक किरण शिंदे तपास करीत आहेत.