breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीतील हाॅटेल रत्नासमोरील झाड अचानक कोसळले, तिन जखमी

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चाैकातून पिंपरीगावाकडे जाणा-या रस्त्यावरील पीएमपी बसथांब्याशेजारील झाड कोसळल्याने थांब्यावरील प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. यामध्ये तीन ते चार विद्यार्थीनींचा समावेश आहे. 

पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पिंपरीगावाकडे जाण्याऱ्या मार्गावर पीएमपीचा बसथांबा आहे. या थांब्यालगतच एका कंपनीची सिमाभिंत असून सिमाभिंतीच्या आत असलेले एक मोठे झाड अचानक कोसळले. हे झाड बस थांब्यावर पडल्याने येथील प्रवासी जखमी झाले. यामध्ये तीन विद्यार्थिनींचा समावेश आहे. यातील जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. शाळा, महाविद्यालय सुटण्याची वेळ असल्याने थांब्यावर गर्दी होती. या घटनेमुळे रस्त्यावर वाहतूककोंडी झाली होती. यामध्ये एका वाहनाचेही नुकसान झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button