breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपने आयुक्तांना पाडले एकाकी, महापाैर, पक्षनेत्यांनी बैठकीकडे फिरविली पाठ

निविदेचे नेमकं गाैडबंगाल काय? 650 कोटीवर कोणाचा डोळा; निविदेला पालकमंत्री देणार स्थगिती?

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाई कामांच्या निविदेबाबत सत्ताधारी भाजपसह सर्वपक्षीय विरोधकांची आज (सोमवार) आयुक्तांच्या दालनात बैठक आयोजित केली. पण त्या बैठकीला मुख्यालयात असूनही महापाैर, उपमहापाैर, सत्तारुढ पक्षनेते यांनी पाठ फिरविली. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निविदा राबवण्यास सांगून सत्ताधा-यांनी त्यांना एकाकी पाडले आहे. तसेच सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी कोणाच्या सांगण्यावरुन बैठकीकडे पाठ फिरवून सुमारे 650 कोटीवर नेमका कोणाचा डोळा आहे, याबाबत तर्कविर्तक लढविले जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य व अंतर्गत रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई कामांची सुमारे 650 कोटी रुपयाची निविदा प्रक्रिया राबविली आहे. त्या निविदेला स्वयंरोजगार व बेरोजगार फेडरेशनसह कामगारांनी आक्षेप घेवून निविदा रद्दची मागणी केलीय. त्यावर मध्यस्थीने तोडगा काढण्याकरिता आयुक्तांच्या दालनात आज बैठकीचे आयोजन केले होते. भाजपचे महापाैर उषा ढोरे, उपमहापाैर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके या सर्वांनी बैठकीकडे पाठ फिरविली. तर स्थायी सभापती विलास मडेगिरी हे आयुक्ताच्या दालनातून परत आले.

दरम्यान, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाई निविदेवरुन सत्ताधारी भाजप पदाधिकारी एकाकी पाडले आहे. त्यामुळे आयुक्तांनी त्याच्या सहका-याकडे तीव्र शब्दात सत्ताधा-यांबाबत नाराजी व्यक्त केल्याचे माहिती समजते आहे. तसेच यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाई निविदा प्रक्रियेला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारांकडून स्थगिती देण्याचा विचार सुरु आहे, अशी चर्चाही पालिका वर्तुळात सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button