breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचाच हवा

रायगड | महाईन्यूज

मंत्रिपदाच्या बाबतीत पक्षाची अडचण समजून घेतली, पण पालकमंत्री पदाच्या बाबतीत तडजोड सहन करणार नाहीये. जिल्ह्याचा पालकमंत्री शिवसेनेचाच हवा अशी आग्रही भूमिका रायगड जिल्हा शिवसेना कार्यकारिणीने मंगळवारी घेतली आहे. रोहा येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली आहे. यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आम्ही पक्ष मजबूत केला. पक्षाला गतवैभव प्राप्त करून दिले, जिल्ह्यातून तीन आमदार निवडून दिले, मावळचे खासदार निवडून दिले, जिल्हा परिषदेत १८ सदस्य शिवसेनेचे आहेत, ३०० ग्रामपंचायती, ३ नगर पालिका, २ नगरपंचायत शिवसेनेनं जिकल्या, ५ पंचायत समित्यांवर भगवा फडकवला, किमान पालकमंत्रीपद वाटप करताना याचा विचार व्हायला हवा होता. पण तसे झाले नाही अशी भूमिका उपस्थितांनी यावेळी मांडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button