breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात २४ तासात २४ हजार ८८६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ

मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांनी तब्बल १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी राज्यात एका दिवसात २४ हजार ८८६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात ३९३ जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासात राज्यात १४ हजार ३०८ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ७ लाख १५ हजार २३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.४ टक्के इतके आहे.

महाराष्ट्रात पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २,२३,७१० इतकी झाली आहे. त्यापैकी १,४६,१८२ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून ४६९३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात ७२,८३५ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा १,६५,३०६ वर पोहचला असून ८०६७ जण दगावले आहेत. मुंबईत १,२९,२४४ जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या २७,६४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १० लाख १५ हजार ६८१ इतका झाला आहे. सध्या राज्यात २लाख ७१ हजार ५६६ रूग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात २८ हाजर ७२४ जण कोरोनामुळे दगावले असून राज्याचा सध्याचा मृत्यूदर २.८३ टक्के इतका आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button