breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला बेदम मारहाण, शिवसेना कार्यकर्त्यांना अटक

मुंबई – कार्टुन फॉरवर्ड केल्यामुळे शिवसेनेच्या शाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीनुसार मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सहा जणांना अटक केली. यामध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख आणि एका कार्यकर्त्याचा समावेश आहे. कांदिवली पश्चिम येथे ही मारहाण करण्यात आली होती. मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज शुक्रवारी व्हायरल झालं होतं. यानंतर भाजपा नेत्यांनी शिवसेनवेर टीका करत कारवाईची मागणी केली होती.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या सहा जणांमध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख कमलेश कदम आणि कार्यकर्ता संजय मांजरे यांचा समावेश आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारं एक कार्टून शेअर केल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांकडून आपल्यावर हल्ला करण्यात आला.

समता नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उत्तर विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत यांनी हल्ल्यासाठी जबाबदार आरोपींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. यानंतर काही तासातच हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असणारे कमलेश कदम आणि संजय मांजरे यांना अटक करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button