breaking-newsआंतरराष्टीय

पॅसिफीक बेटांच्या परिसरावर प्रभुत्व मिळवण्याचा चीनचा प्रयत्न

नोव्हेंबर मध्ये बोलावण्यात आलेल्या परिषदेला न्युझीलंडचा आक्षेप 
वेलिंग्टन – चीनने आता आपला मोर्चा पॅसिफीक बेटांच्या परिसराकडे वळवला असून त्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांची एक बैठक त्यांनी येत्या नोव्हेंबर महिन्यात आयोंजित करण्याचे योजले आहे. चीनच्या या प्रयत्नांना न्युझीलंडने आक्षेप घेतला आहे. या दुर्लक्षित भागावर लक्ष केंद्रीत करून तेथे याद्वारे प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा त्यांचा डाव आहे असा आरोप न्युझिलंडने केला आहे.

येत्या 12 ते 18 नोवेहंबर या काळात होणाऱ्या अशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य परिषदेच्या आधी ही बैठक घेण्याची त्यांची योजना आहे. त्यासाठी चीनने पापुआ न्यु ग्यनिआ हे ठिकाण निश्‍चीत केले आहे. न्युझिलंडचे पंतप्रधान पीटर ओनिल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी या परिषदेची कार्यक्रम पत्रिका अद्याप जाहीर केलेली नाही पण त्यांना या परिषदेद्वारे येथील छोट्या बेटांवर वसलेल्या राष्ट्रांवर प्रभुत्व गाजवायचे आहे. त्यांचा उद्देश सरळ आणि स्पष्ट आहे असे ते म्हणाले.

या बेटांच्या परिसरात ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडचे प्रभुत्व आहे. पण तेथे आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी चीनचे गेल्या एका दशकापासून अप्रत्यक्षपणे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चीनने या भागातील छोट्या देशांना सन 2006 ते 2016 या अवधीत एकूण 1.78 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे. या भागात तैवानचे काही मित्र देशही आहेत. त्यांनाही आपल्या पंखा खाली घेण्याचा चीनच्या अध्यक्षांचा डाव आहे असे सांगण्यात येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button