breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

राज्यात ठिणगी पेटली! एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्ना यांचा पुतळा

बेळगाव: बेळगावमध्ये पुन्हा एकदा पुतळ्यावरून नवा वाद सुरू झालेला आहे. पिरणवाडी गावात संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रायन्ना यांचा पुतळा बसवल्याने पुन्हा एकदा वादाला सुरूवात झालेली आहे. यामुळे पिरनवाडी गावातील मराठी भाषिक हे रस्त्यावर उतरलेले आहेत.

रायन्ना यांच्या पुतळ्याला मराठी भाषिकांचा तीव्र विरोध आहे. अशात कन्नड संघटनांनी मध्यरात्री 3 वाजता रायन्ना यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर बसवला आहे. संगोळी रायान्ना कित्तूर साम्राज्यातील सेनाप्रमुख यांनी हा पुतळा बसवला असल्याची माहिती देण्यात येत आहे. तर रायन्ना यांचा पुतळा इतर ठिकाणी हलवा अशी मागणी मराठी भाषिक करत आहेत. या सगळ्यामुळे पिरनवाडी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान, याआधीही कर्नाटकातील बेळगावमधील मनगुत्ती गावात पोलिसांना रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद पेटलेला होता. मनगुत्ती इथलं आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केलेला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button