breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये एँटीव्हायरल औषध रेमडेसिवीर ठरतंय उपयु्क्त

कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये एँटीव्हायरल औषध रेमडेसिवीर उपयु्क्त ठरल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणू संक्रमणाची तीव्र लक्षणे आहेत त्यांना या औषधाचा उपयोग होत असल्याचे दिसून आलं आहे…

अमेरिकेतील साथरोग नियंत्रण विभागाचे संशोधक एँथनी फॉसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूबाधित रुग्णांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी रेमडेसिवीर हे औषध प्रभावी ठरते आहे. आतापर्यंत या औषधांचे पाच दिवसांचे आणि दहा दिवसांचे डोस रुग्णांना देऊन त्याची चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीनुसार ज्या रुग्णांना या औषधाचा १० दिवसांचा डोस देण्यात येतो त्यांच्या प्रकृतीत जेवढी सुधारणा होते. तेवढीच पाच दिवसांचा डोस देणाऱ्या रुग्णांच्या प्रकृतीतही होते आहे.

कॅलिफोर्नियातील औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनी जीलीड सायन्सेसने या चाचण्या घेतल्या. त्यातूनच हे निष्कर्ष दिसून आले. एकूण ३० देशांमध्ये या कंपनीचे काम सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button