breaking-newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७,३३,५६८ वर

  • मुंबईत १,३५०, पुण्यात ३,७०३ नवे रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात काल सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले. दिवसभरात राज्यात तब्बल १४ हजार ७१८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ३५५ जणांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ३३ हजार ५६८ वर पोहोचली आहे. यापैकी २३ हजार ४४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, काल दिवसभरात ९ हजार १३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एकूण ५ लाख ३१ हजार ५६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ७२.४६ टक्के इतके झाले आहे.

मुंबईत गुरुवारी दिवसभरात १ हजार ३५० नवे रुग्ण आढळले. तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १ लाख ४० हजार ८८२ वर पोहोचली आहे. तसेच काल ८३४ जणांनी कोरोनावर मात केली असून राज्यात आतापर्यंत १ लाख १३ हजार ५७७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंतच्या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत गुरुवारी पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांचा उच्चांक नोंदला गेला. गुरुवारी दिवसभरात तब्बल ३ हजार ७०३ नवे रुग्ण आढळले, तर ६९ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ७७३ जणांचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात २ हजार ८१२ जण कोरोनामुक्त झाले. यासह पुणे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १ लाख ५६ हजार ८४४ वर पोहोचली आहे. यापैकी १ लाख २१ हजार ४०२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button