breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुंबई : आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, शिवसेना नेते एकनाथ शिंदेंचं बंडानंतर पहिलं ट्विट

मुंबई : राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपनं यश मिळवल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारपुढं राजकीय संकट निर्माण आहे. शिवसेनेचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या नॉट रिचेबल असून बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे २२ आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं असून “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button