breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

किशोरी पेडणेकर यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही उल्लेख

मुंबईः महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपालांनी ठाकरे सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी पत्र लिहलं आहे. त्यामुळं सत्ताबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. तर, एकीकडे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे त्यांना ही धमकी देणाऱ्या आल्याचं बोललं जात आहे. तसंच, या पत्राची तातडीने दखल घेऊन कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (Kishori Pednekar Has Received A Threat Letter)

सरकार अल्पमतात आल्यानंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवरच किशोरी पेडणेकरांना धमकीचे पत्र आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आधीही किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र देण्यात आलं होतं. सरकार पडू देत मग बघून घेऊ असं या पत्रात लिहण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे या धमकीच्या पत्रात अजित पवारांचा उल्लेखही करण्यात आला आहे. धमकीच्या पत्रात अश्लील भाषेत शिवीगाळही करण्यात आली आहे. सरकार पडू दे.. नंतर तुला जीवे मारू. ते पत्रही मीच पाठवलं होतं. तुला जे करायचं ते कर. उद्धव ठाकरेंना सांग, असं या पत्रात लिहलं आहे. तसंच, अजित पवारांनीच महाविकास आघाडी सरकार पाडण्यास सांगितल्याचा उल्लेख या धमकीच्या पत्रातून करण्यात आला आहे. विजेंद्र म्हात्रे असं धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव असून पत्रावरील पत्ता उरणचा आहे.

तिसऱ्यांदा धमकीचे पत्र

किशोरी पेडणेकर यांना याआधीही धमकीचे पत्र आलं आहोते. त्यावेळी सुद्धा त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. महापौर झाल्यापासून त्यांना तिसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी मुंबई पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button