breaking-newsमहाराष्ट्र

राज्यातील ‘लालपरी’ LNGवर धावणार, 1 हजार कोटींची बचत होणार

डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाने आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी महामंडळाच्या 18 हजार बसेस ‘एलएनजी’वर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महामंडळाला वर्षाकाठी 1 हजार कोटींचा फायदा होईल असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने पंढरपूर येथे उभारण्यात येणाऱ्यायात्री निवास आणि नवीन स्थानकाचा भूमिपूजन समारंभ काल(दि.3) रावते व वारकरी संप्रदायातील प्रमुख विभूतींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रावते यांनी ही माहिती दिली.

यासाठी पहिल्या टप्प्यात 18 हजार एसटी बसेसमध्ये तांत्रिक बदल करावे लागणार आहेत. या बदलासाठी एका बसवर किमान 1 लाख 50 हजार रुपये खर्च करावा लागणार आहे. येत्या काही महिन्यांत राज्यातील विविध बस डेपोंमधील सुमारे 18 हजार एसटी बसमध्ये तांत्रिक बदल केले जातील. त्यानंतर एसटी बस एलएनजीवर धावतील, असे रावते म्हणाले.

या निर्णायामुळे पर्यावरणाचा ऱ्हास टळणार असून राज्यातील 18 हजार बसेस मध्ये किरकोळ दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत असे रावते यांनी सांगितले . एसटी यासाठी आपले पंप बाहेर बसवणार असून यातून सर्वसामान्य ग्राहकांनाही त्यांच्या गाडीत LNG टाकता येणार असल्याचे रावते यांनी सांगितले . यामुळे डिझेलवर खर्च होणार 1 हजार कोटींचा खर्च वाचणार असून अशा पद्धतीने LNG वर बस चालवणारा महाराष्ट्र देशातील पहिला असणार असल्याचे त्यांनी सांगितले .

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या बसेसमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून महामंडळ कर्मचाऱ्याचा पगार भागू शकतो. ही महत्वाची यात्रा असल्याने यासाठी वेगळे नियोजन केले जात असल्याचे रावते यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना आता 750 रुपयाचा पॉकेट मनी देण्याची योजना सुरु केली असून या मुलांच्या परदेशी उच्य शिक्षणाचा खर्च देखील महामंडळ उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले . महामंडळ कर्मचाऱ्याच्या मुलींसाठी 1 लाखाची ठेव योजनेतून आतापर्यंत 1 हजार कर्मचाऱ्यांना लाभ झाल्याचेही रावते यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button