breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांची आई माधवी सिंधिया कोरोना पॉझिटीव्ह

नवी दिल्ली | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांची आई माधवी राजे सिंधिया यांचे कोरोना तपासणी अहवाह पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळं खबरदारी म्हणून दोघांनाही दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सिंधिया यांना घसा खवखवणे तसेच तापाची काही लक्षणे होती. यानंतर त्याची कोरोना टेस्ट झाली. त्यात त्यांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्याची आई माधवी राजे सिंधिया यांना चार दिवसांपूर्वी मॅक्स साकेत दाखल करण्यात आले होते. ज्योतिरादित्य सिंधियामध्ये कोरोनाची लक्षणे होती, पण त्याच्या आईला काही लक्षण नव्हते. आज दोघांचा चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. आता दोघांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केल्यापासून ज्योतिरादित्य सिंधिया दिल्लीत असल्याचे सांगण्यात येत आहे. ते आपल्या कुटुंबासमवेत दिल्ली येथील निवासस्थानी राहत होते, परंतु चार दिवसांपूर्वी अचानक ज्योतिरादित्य सिंधिया यांना कोरोनाचे लक्षणे दिसले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांना क्वॉरंटाईन करण्याची तयार प्रशासनाकडून केली जात आहे. नुकतेच ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेस सोडली आहे. ते कॉंग्रेसचे सरचिटणीस होते, पण कॉंग्रेसचा हात सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सिंधिया भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार पडले. मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य सिंधिया यांना राज्यसभेचे तिकीटही भाजपने दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button