breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘तुमच्या लेणी बघायला कुत्रंही येत नाही’, माजी खासदार आढळराव पाटील याचं वादग्रस्त वक्तव्य

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

शिवसेना शिरुरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी “तुमच्या लेणी बघायला कुत्रंही येत नाही’ असे वादग्रस्त विधान केलयं, यामुळे लेणी अभ्यासक, संशोधकांचा त्यांनी अपमान केल्याची भावना व्यक्त होत आहे.

लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे लेण्यांविषयी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे लेणी अभ्यासकांच्या भावना दुखावल्या आहेत. याबाबत अनेकांनी सकाळपासून आपल्या भावनांना सोशल मीडियावर मोकळी वाट करून देत त्या विधानाचा निषेध व्यक्त केला आहे.

लेण्याद्री येथील अष्टविनायकाचे दर्शनासाठी विनाशुल्क प्रवेश मिळावा या व अन्य मागणीसाठी स्थानिक नागरिकांचे येथे उपोषण सुरू आहे. शनिवारी (ता.28) उपोषणकर्त्याची भेट प्रसंगी बोलताना त्यांनी हे विधान केले. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ऐतिहासिक लेण्यांचा वैभवशाली वारसा जुन्नरला लाभला आहे. देश-विदेशातील अनेक लेणी अभ्यासक, संशोधक व पर्यटक वर्षभर लेण्या पाहण्यास व त्यांचा अभ्यासासाठी येत असतात. मात्र, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी “तुमची लेणी बघायला कुत्रंही येत नाही’ असे वादग्रस्त विधान केल्याने खळबळ माजली आहे.

ते म्हणाले, “”लेण्याद्रीला दर्शनाला येणाऱ्या भाविकांकडून पुरातत्त्व विभाग तिकीट घेत आहे. ते बंद करण्यासाठी आम्ही अनेक वर्षे पाठपुरावा करीत आहोत. पैसे घेऊन दर्शन घ्यायचे असे भारतात कोठेही नाही. लेणीला जायला वेगळा रस्ता व मंदिराकडे जायला वेगळा रस्ता करावा. जेणेकरून ज्यांना लेणी पहायची ते पैसे देऊन जातील व ज्यांना दर्शनाला जायचं ते फुकट जातील.” उपोषणामुळे गेल्या काही दिवसांत पर्यटक व पुरातत्त्व खात्याचे कर्मचारी यांच्यात वाद होत असल्याने याबाबत त्यांनी येथे फलक लावून त्यांची भूमिका मांडली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button