breaking-newsराष्ट्रिय

मनोहर पर्रीकरांची प्रकृती ढासळली, भाजपा नव्या मुख्यमंत्र्यांच्या शोधात

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची प्रकृती ढासळली आहे. शनिवारी दिवसभर गोव्यामध्ये पर्रीकरांच्या तब्येतीवरुन दिवसभर प्रचंड अफवा पसरल्या. मनोहर पर्रीकर कोमात गेल्याच्या चर्चेलाही उधान आले होते. मात्र, मनोहर पर्रीकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात येत आहे. त्यातच काँग्रेसने गोव्यामध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती ढासळली आहे ते सत्ता चालवू शकत नाहीत त्यामुळे हे सरकार बरखास्त करून आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्यावी असं काँग्रेसने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

गोवा मुख्यमंत्री पदासाठी भाजपाने नव्या पर्यायाचा शोध सुरू केला आहे. शनिवारी रात्री गोवा भाजपाची बैठकही पार पडली. गोव्यातील भाजपा आमदारांनी पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्री येथील आमदारातून आसावा असा सल्ला यावेळी दिला आहे. भाजपाने आपल्या सर्व आमदारांना गोव्यातच राहण्याची सूचना केलेली आहे. मुंबईत फुटबॉल मॅच वगैरे पहायला कुणी जाऊ नये, अशीही सूचना आमदारांना करण्यात आली आहे. सर्व आमदारांना मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याच्या स्थितीविषयीची कल्पना भाजपा कोअर टीमने दिलेली आहे.

गोवा मुख्यमंत्री पदासाठीचा उमेदवार ठरवण्यासाठी भाजपा अध्यक्ष आणि केंद्रातील नेते आज रविवारी आमदारांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्रातील काही दिग्गज नेते आज गोव्यामध्ये हजेरी लावू शकतात. यावेळी गोव्यातील मित्रपक्षासोबत बैठकही आयोजीत करण्यात आली आहे. तीन अपक्ष आमदारांसोबतच गोमांत पार्टी आणि गोवा फॉवर्ड पार्टीच्या नेत्यासोबतची याबाबत चर्चा होणार आहे.

राज्याचे मंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी शनिवारी पाच आमदारांसह पर्रीकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यात त्यांच्या पक्षाचे जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर यांच्यासह रोहन खावटे, गोविंद गावडे आणि प्रसद गावकर या तीन अपक्ष आमदारांचाही समावेश होता. मुख्यमंत्र्यांची प्रकृती ढासळली असली, तरी स्थिर आहे. आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. त्यांच्या आजाराची नेमकी माहिती सांगता येणार नाही. मात्र, त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास सुरू नाही,’ असे सरदेसाई यांनी सांगितले.

मनोहर पर्रीकर यांना झोपूनच रहावे लागते. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. त्यात आता सुधारणा झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली. आताही त्यांना वारंवार कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागतो. सकाळच्यापेक्षा सायंकाळी त्यांची स्थिती सुधारली पण स्थिती चिंताजनक आहे.

दरम्यान, गोव्यात भाजपा सरकार सत्ता चालवण्यात अपयशी ठरलं आहे. त्यामुळे आम्ही राज्यात सर्वात मोठा पक्ष आहोत ही बाब लक्षात घेऊन आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी अशा संदर्भातले एक पत्र काँग्रेसने राज्यपालांकडे सोपवलं आहे. आम्ही गोव्यात सर्वात मोठा पक्ष ठरलो आहोत आणि हा गोव्यातल्या जनतेचा कौल आहे ज्यावर आपण विचार कराल अशीही विनंती काँग्रेसने केली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मागील वर्षांपासूनच त्यांची प्रकृती वारंवार बिघडली आहे. अशा परिस्थितीत त्यांनी राज्याचं बजेटही सादर केलं होतं. मात्र आता काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा करत तसं पत्रच राज्यपालांकडे सोपवलं आहे आणि जनमताचा विचार करावा अशीही मागणी केली आहे. गोव्याचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कावलेकर यांनीही मागणी केली आहे. भाजपानेही नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे शनिवारी गोव्यामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button