breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उध्दवस्थ शेतक-यांना खोटे आश्वासन देणा-या सरकारला हद्दपार करा

नाशिक –  लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या 8 मार्चला लागण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा मध्यात महाराष्ट्रात मतदान होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. देशातील अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली असताना उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला पुन्हा खोटे आवतन देणाऱ्या भाजपा सरकारला हद्दपार करा असे आवाहनही पवारांनी केले.

नाशिक येथे नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, राजकीय गरज भागविण्यासाठी भाजपाने देशात जी आपत्ती आणली आहे, तिचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका आहे. त्यामुळे बूथप्रमुखांनी सतर्क राहून काम करावे आणि सकाळीच मतदानयंत्रे तपासून घ्यावी. कारण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातातून ती जात असल्याने भाजपा रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न करणार आहे अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली. छगन भुजबळ यांनी नाशिकचा चेहरा-मोहरा बदलला आहे. त्यांच्याकडेच नाशिकची संपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे या विकासपुरुषाच्या पाठीशी ठामपणे उभे रहा असे आवाहनही पवार यांनी केले.

ज्या राज्यांत भाजपाची सत्ता होती, ती राज्ये भाजपाच्या हातातून गेली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत परिवर्तन होणारच असा ठाम विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button